फुकटचे श्रेय घेण्याची घुले घराण्याची परंपरा नाही : नितेश पारनेरे


बोधेगाव 

आमदाराचे काम आहे तर कांबी, हातगाव, मुंगी गावच्या सिंगल फेजचा गेल्या कित्येक वर्षापासूनचा प्रश्न का सोडवण्यात आला नाही ? बोधेगाव येथील काळ्या ओढ्याचा  प्रश्न गेल्या दोन वर्षापासून एरणीवर होता तो मागील वर्षी तात्पुरत्या स्वरूपात का होईना का मार्गी लागला नाही.अशा प्रकारचे प्रतीप्रश्न मांडत काम आमदाराचे, पन होत नसल्याने सभापती डॉ क्षितिज भैय्या घुले यांच्या विशेष प्रयत्नातुन ते मार्गी लागले त्यामुळे ईतरांनी नाही तर घुलेनी मंजूर केलेल्या कामाचेच आम्ही उद्घाटन करतो. असा प्रती टोला आ मोनिका राजळे यांचे नाव न घेता कांबी गावचे सरपंच नितेश पारनेरे यांनी लगावला.बोधेगाव येथे रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी आ मोनिका राजळे यांनी मंजुर कामाचे श्रेय घेण्यावरून सभापती घुले यांचे नाव न घेता टीका केली होती याला उत्तर देताना पारनेरे बोलत होते.
        शेवगांव तालुक्यातील कांबी याठीकाणी डॉ क्षितिज भैय्या घुले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर सिंगल फेजच्या उद्घाटन प्रसंगी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे मा उपसभापती शिवाजीराव नेमाने,मा उपसरपंच भाऊराव भोंगळे, राजेंद्र भराट, सुरेश दुसंगे,मार्केट कमीटीचे संचालक राजेंद्र ढमढेरे,राष्ट्रवादीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष मोहित पारनेरे, खामपिंपरी चे सरपंच संतोष पावसे, हातगावचे सरपंच अरुण मातंग,निर्मळ भाऊसाहेब, स्वप्नील राजेभोसले, भाऊ पवार,बाबा म्हस्के, विजय लेंडाळ, संभाजी म्हस्के दत्ता शिलेदार, ईश्वर शिंदे बाळासाहेब म्हस्के, बंडु थोरात, बाजीराव लेंडाळ, महादेव शिंदे, माऊली म्हस्केसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
      म्हणाले की, कांबी गावातील लेंडाळ, कर्डीले, शिंदे वस्ती बरोबर हातगाव तसेच मुंगी भागातील काही शेतकऱ्यांना शेतात सिंगल फेज लाईट नसल्याने अनेक समस्येला सामोरे जावे लागत होते. अनेक प्रयत्न करून देखील हा विषय मार्गी लागत नसल्याने कांबीसह हातगाव मुंगी  गावातील शिष्टमंडळामार्फत डॉ क्षितिज घुले यांच्या माध्यमातून उर्जा मंत्री प्राजक्तादादा तनपुरे यांची भेट घेत शेती पंपासाठी वाढीव फिडर आणि सिंगल फेज साठी मागणी केली होती याची फलश्रुति म्हणून आज शेतीवर जाणाऱ्या लाईट साठी सिंगल फेजची मंजुरी मिळाली असुन त्याचे आज दि.१ नोव्हेंबर रोजी नारळ वाढवुन पुजन करण्यात आले. या सिंगल फेजमुळे गेल्या कित्येक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लागल्याने तिन्ही गावातील शेतकऱ्यांकडुन घुले कुटुंबाला धन्यावाद देऊन  आनंद व्यक्त केला जात आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या