शिक्षकांनी अध्यापनासाठी संगणकाचा वापर करणे काळाची गरज : राज्यमंत्री भरणे


इंदापूर  प्रतिनिधी

बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या अध्यापनामध्ये संगणकाचा वापर करणे काळाची गरज बनली आहे.ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान इंदापूर यांच्या प्रयत्नातून आणि इन्फोसिस कंपनी व डाॅरबिट फाउंडेशन पुणे यांच्या सौजन्याने रविवारी (दि.३१) अंथुर्णे केंद्रातील बारा शाळांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १५८ संगणक वितरण करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

राज्यमंत्री भरणे म्हणाले की,आज-काल शिक्षणाबरोबरच सर्व क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर हा खूप महत्त्वाचा बनला आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतच विद्यार्थ्यांना संगणक हाताळणीचे ज्ञान व नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी या संगणकाचा नियमित वापर झाला पाहिजे.  इंदापूर तालुका ऑनलाईन शैक्षणिक कार्यामध्ये सध्या पुणे जिल्ह्यात अग्रेसर राहिल्या बद्दल सर्व शिक्षक व अधिकारी यांचे मनापासून कौतुक व अभिनंदन केले. 

पुणे येथील इन्फोसिस कंपनी व स्पर्श फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या  माध्यमातून इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे केंद्रातील १२ जि. प. प्राथमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी १५८ अद्यावत संगणक संच भेट दिले आहेत. या उपक्रमांतर्गत अंथुर्णे केंद्रातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाद्वारे सध्याच्या संगणक युगातील नवीन शैक्षणिक प्रवाहामध्ये संगणक वापर, हाताळणी आणि आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त व्हावे व भविष्यकाळात उच्च शिक्षणात त्यांना संगणक ज्ञानाचा उपयोग व्हावा या उद्देशाने इंदापूर तालुक्यामधून भगवानराव भरणे प्रतिष्ठान इंदापूर यांच्या विशेष प्रयत्नाने हे संगणक मिळाले आहेत.

यावेळी जि.प.सदस्य वैशाली पाटील, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, पं.स.सदस्य सतिश पांढरे , भरणेवाडीचे सरपंच आबासाहेब भरणे, भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत भरणे,श्रीराज भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस युवाकाध्यक्ष शुभम निंबाळकर , गटविकास आधिकारी विजयकुमार परीट,गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख भिवा हगारे, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळातील व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य ,ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्य सर्व शिक्षक तसेच कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान इंदापूरचे सदस्य यांची उपस्थिती होती. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या