बातमी वाचणीय करण्याचे कौशल्य दै. राष्ट्र सह्याद्रीने जपलेः ना. थोरात


चंद्रकांत वाक्चौरे । राष्ट्र सह्याद्री

नगर : सनईचे सुमधूर श्रवणीय संगीत.. एकापोठापाठ येणारे निमंत्रित मान्यवर.. एकमेकांचे हस्तांदोलनातून स्नेहभेटीच्या चेहऱ्यावर आनंदछटा  अन् सोबतीला विविध क्षेत्रांतील ख्यातनाम व्नत्यांची बौद्धीक मेजवानी... अशा नयनमनोहर अन् स्वर्गीयसुखानुभूतीचा प्रत्यय दैनिक राष्ट्र सह्याद्रीच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या औचित्याने आला! सावेडी येथील माऊली संकुलाच्या सभागृहात दुपारी सुरु झालेला सोहळा सूर्यास्तापर्यंत उत्तरोत्तर रंगल्याने दै. राष्ट्र सह्याद्री प्रसार माध्यमावर प्रेम करणाऱ्या उपस्थितांना चेहऱ्यावरचे स्मितहास्य लपवता आले नाही..! 

दिवसेंदिवस प्रसार माध्यमांचे स्वरुप बदलत असले तरी प्रिंट संपणार नाही. सकाळी चहासोबत वृत्तपत्र वाचल्याशिवाय मनाला समाधान वाटत नाही. किमान आमची पिढी आहेए तोपर्यंत प्रिंट मीडिया सुरु राहिल, असा ठाम विश्वास व्यक्त करुन, हल्ली सोशल मिडियातून क्षणार्धात बातमी कळते, मात्र याच बातमीचे नेमके मर्म लक्षात घेवून, योग्य मुद्यावर बोट ठेवून, बातमी वाचणीय करण्याचे कसब दैनिक राष्ट्र सह्याद्रीने जपल्याचे गौरवोद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी काढले.

बहुजन समाजातील तरुण नवी उमेद घेवून, पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना नाउमेद न करता, प्रोत्साहन दिले पाहिजे. राष्ट्र सह्याद्री वृत्तपत्र समुहाने वाचकांच्या अभिरुचीचे अवलोकन केले आहे. नाविण्यपूर्ण वृत्त मांडून ते वाचकांच्या पसंतीस उतरल्याची दिलखुलास प्रशंसा करुन, राष्ट्र सह्याद्री नियमीत वाचत असल्याचे ना. थोरात म्हणाले.  

गेल्या काही वर्षांपासून काही वृत्तपत्र अशीही निघाली की, ज्याचे नावे वाचताच सामान्य वाचकाच्या मनात धडकी भरते, अशी मिश्किली ना. थोरात यांनी नेहमीच्या शैलीत केली अन् सभागृहात हास्याचे फवारे उडाले.. तत्पूर्वी साखरबाई नवले यांच्या हस्ते तुळशीला पाणी घालून तसेच मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या सोहळ्याचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी ना. बाळासाहेब थोरात, आ. लहु कानडे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, निवासी जिल्हाधिकारी संदीप निचीत, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप मिटके, कार्यकारी संपादक पूनम नवले, व्यवस्थापकीय संपादक रजनी शेट्टी, गाढवचं लग्न फेम अभिनेते बाळासाहेब बांगर, फ्रेंचायझी ओनर, कार्यालय प्रमुख संजिता सिरसाठ, मंगेश सिरसाठ, ज्ञानदेव वाफारे, मुख्य व्यवस्थापक दत्तात्रय मेटे, डेव्हलपमेंट ऑफिसर संजय गवारे, सह्याद्री युथ फोरमचे जिल्हाध्यक्ष सनी क्षेत्रे, सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी ज्ञानेश्वर मुरकुटे आदींच्या हस्ते सह्याद्री युथ फोरम व फॅमिली्नलबचे उद्घाटन करण्यात आले. 

दरम्यान, दुपारपासून सायंकाळपर्यंत सुरु असलेल्या या सोहळ्यास आ. निलेश लंके, आ. संग्राम जगताप आदींसह हितचिंतकांनी भेटी देवून दै. राष्ट्र सह्याद्री माध्यम समुहाला सदिच्छा व्यक्त केल्या. या सोहळ्यात शेतकरी मच्छिंद्र गावडे, युवा उद्योजक अमोल बेगडे, उद्योजक गणेश भांड, भारत पुंड व पोलीस नाईक सोमनाथ वासगावकर यांना योगदान पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रवीण जमधाडे यांनी केले. व्यवस्थापकीय संपादिका रजनी शेट्टी यांनी आभार मानले. दरम्यान, या सोहळ्यासाठी नगरसेवक सुनील त्रिंबके, निखील वारे, बबलू सूर्यवंशी, अ‍ॅड. प्रतापराव पाचपुते, काँग्रेस शहराध्यक्षा सुनीता बागडे, राहुल साळवे, बाळासाहेब पवार, इंजि. दीपक नवले, उद्योजक रविंद्र नवले, कर अधिकारी दत्तात्रेय नवले, उस्मानाबादचे विश्वजित खोचरे, शोभा गायकवाड, पृथ्वीजीत खोचरे, शोभा गायकवाड, रजनीताई ताठे, यांच्यासह राष्ट्र सह्याद्रीचे वरिष्ठ उपसंपादक चंद्रकांत वाक्चौरे, जाहिरात प्रतिनिधी प्रशांत ओहोळ, व्हिडीओ एडिटर संतोष बनसोडे, प्रियंका यादव, गणेश हापसे, योगेश हिरवे, मोईन पठाण, सचिन उघडे, नितीश केदारी, अतुल सोनवणे, सतीष धाडगे, पत्रकार सुधीर चव्हाण, लक्ष्मण पटारे, दादा सोनवणे, दादा डोंगरे, किशोर कदम, परदेशी, केशव कातोरे, योगेश चंदन, उद्धव देशमुख, तारामती दिवटे, दीपक खोसे, पत्रकार अशोक गाडेकर, अनिल पांडे, महेश माळवे, शफीक बागवान, मंचर कार्यालय प्रमुख मनेश तळेकर आदी उपस्थित होते.


राष्ट्र सह्याद्रीच्या विविधांगी उपक्रमांचे कौतुक करावे तेवढे थोडेः खा. डॉ. सुजय विखे   

दैनिक राष्ट्र सह्याद्री हे वृत्तपत्र श्रीरामपुरातून प्रकाशित होते, तेथे सर्वाधिक बातम्यांचा उगम होतो, असे मत खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले. या तालुक्यातील राजकारण गुंतागुंतीचे असल्याचे सांगत नगर शहरातील उड्डाणपुलासह विविध प्रश्नी मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शहराने मला सर्वाधिक मताधिक्य दिल्याचे स्पष्ट करुन, येथील सुज्ञ नागरिकांवर त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. आजोबा पद्मविभूषण स्व. बाळासाहेब विखे व वडील आ. राधाकृष्ण विखे यांच्या व्यापक विचारधारेचा वारसा अव्याहतपणे पुढे चालवत असल्याचे त्यांनी या व्यापपिठावरुन, आवर्जून नमूद केले. राष्ट्र सह्याद्रीच्या विविधांगी उपक्रमांचे त्यांनी दिलखुलासपणे कौतुक केले.

राष्ट्र सह्याद्रीच्या उपक्रमातून समाजाला नवी दिशाः आ. कानडे

दैनिक राष्ट्र सह्याद्रीने प्रिंट मिडियाला जोडून डिजिटलसह युथ फोरम, फॅमिली्नलब व प्रथमच फ्रेंचायची देण्याची नवी व्यापक संकल्पना अंमलात आणून त्यावर काम सुरु केल्याने समाजाला नवी दिशा मिळणार असल्याचे भाष्य आ. लहु कानडे यांनी केले. या कार्यातून नवे प्रबोधन होणार असल्याचे सांगत आ.कानडे म्हणाले, या वृत्तपत्राच्या माध्यमातून न्नकीच आदर्शवत कार्य घडो, अशा शब्दात त्यांनी  राष्ट्र सह्याद्रीच्या कार्याचा गौरव केला.

राज ठाकरेंनंतर खा. सुजय दादा...

राष्ट्र सह्याद्री माध्यम समुहाच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मान्यवरांचे आभार मानताना व्यवस्थापकीय संपादक रजनी शेट्टी यांनी खा. डॉ. सुजय विखे यांच्या  दिलखुलास मिश्किल भाष्य प्रथमच ऐकल्याचे स्पष्ट करुन, मला असे वाटते की, राजकारणात राज ठाकरे यांच्यानंतर खा. सुजय दादाच हास्याचे फवारे उडवू शकतात. आपण तरुणाईचे खरे आयकॉन आहात, असे गौरवोद्गार काढले. 

पोलीस उशीराच येतात..!

आजपर्यंत चहा, वडे आदींच्या फ्रेंचायची दिल्या जात असल्याचे सर्वश्रृत आहे, पण  राष्ट्र सह्याद्रीने थेट पेपरची फ्रेंचायची दिल्याचा नवा पायंडा पाडल्याचे सांगत खा. डॉ. सुजय विखे यांनी आता खासदार चहा येतो की, काय याचीच प्रतिक्षा असल्याचे म्हणताच हशा पिकला. त्यांचे भाषण सुरु असतानाच सोहळ्याच्या मंचावर अप्पर पोलीस अधिक्षक संदीप मिटके यांचे आगमन झाले. त्यांच्याकडे नेत्रकटाक्ष टाकत खा. डॉ. विखे म्हणाले, माझ्या पाठोपाठ पोलीस अधिकारीही आले, यावर श्री. मिटके म्हणाले, पोलीस बहुदा उशीरानेच येतात, यावर पुन्हा हास्यकल्लोळ उडाला..! यावर आपण जिल्ह्यातले दुसरे सिंघम आहात, असे सांगत खा. डॉ. विखे यांनी जिल्हा प्रशासनातील कर्तबगार अधिकाऱ्यांबद्दल कौतुकाचे बोल ऐकवत चौफेर घटनांवर भाष्य केले.

युथ फोरम, फॅमिली्नलबचा उपक्रम प्रेरणादायीः जिल्हाधिकारी भोसले

दैनिक राष्ट्र सह्याद्रीने प्रिंट मिडियाला जोडून डिजिटलसह युथ फोरम, फॅमिली्नलबचा सुरु केलेला उपक्रम केवळ जिल्हा व राज्यातच नव्हे तर अन्य राज्यांसाठी दिशादायी ठरु शकतो, अशा शब्दात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी गुणगौरव केला. दरम्यान, महसूलच्या राजस्व अभियानात ग्रामीण रस्ते, पाणी आदीप्रश्नी या स्वयंसेवकांची मदत होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या माध्यमातून देशसेवा करणारी होतकरु नवी पिढी निर्माण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्र सह्याद्रीची वाटचाल प्रगतीकडे : अभिनेते बांगर

दैनिक राष्ट्र सह्याद्री पेपर मी ऑनलाईन पुण्यात वाचतो. या वृत्तपत्राचे मथळे व सारांश समर्पक व वाचणीय असल्याचे मत सिने निर्माते व अभिनेते गाढवाचं लग्न फेम बाळासाहेब बांगर यांनी व्यक्त केले. प्रयत्नांतून यश मिळतेच, अशा विचारधारेतून या माध्यम समुहाची वाटचाल प्रगतीकडे असल्याचे बोल त्यांनी ऐकवले.

राष्ट्र सह्याद्रीमुळे युवकांना नवी दिशाः भैय्या बॉक्सर

राष्ट्र सह्याद्री माध्यम समुहाच्या युथ फोरमच्या माध्यमातून युवकांना नवी दिशा मिळणार असल्याचा आशावाद भैय्या बॉक्सर यांनी व्यक्त केला. संपादक करण नवले यांची धडपड आणि राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाची घोडदौड यावर डॉक्युमेंटरी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या