आ राहूल जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत्रतपासणी शिबीर


उक्कडगाव वार्ताहर                                

आमदार राहूल  जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न

  कुकडी शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई कला महाविद्यालय ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड पिंपळगाव पिसा तसेच  अर्पण रक्तपेढी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मा. आमदार राहूल जगताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले  होते.सदर रक्तदान शिबिरात एकूण 50 बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले तसेच  100 लोकांची नेत्रतपासणी करण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी मा.आमदार तथा कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच अमहदनगर जिल्हा बँकेचे संचालक व कुकडी शिक्षण संस्थेचे प्रमुख  मा.राहूलदादा जगताप तसेच कुकडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त डॉ. प्रणोतीमाई राहूल जगताप , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजीराव ढगे ,उपप्राचार्य डॉ.शांतिलाल घेगडे  व कारखान्याचे सर्व कर्मचारी ,सावित्रीबाई कला महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्पण रक्तपेढी अहमदनगर यांचे अनमोल सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या