मुंगेरीलाल के हसीन सपने भंगले

महापालिकेत भाजपचा दणदणीत विजय


पुणे प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नगरसेवकांना फोडण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वल्गना हवेतच विरल्या. विरोधकांचे दिवास्वप्न भंगले असून. मुंगेरीलाल के हसीन सपने असेच त्याचे वर्णन करावे लागेल अशी प्रतिक्रिया भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केली. 

पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजपने 22 पैकी 14 जागांवर विजय मिळविला. भाजपने उभे केलेले सर्व उमेदवार विजयी झाले. त्यानंतर मुळीक बोलत होते.

मुळीक म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीच्या भ्रष्ट कारभाराला राज्यातील जनता कंटाळली आहे. सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. पुण्याच्या विकासा साठी राज्य सरकारला गेल्या दोन वर्षात एकही काम करता आलेले नाही. याची जाणीव नगरसेवकांमध्ये पण आहे. पुणेकरांचा विश्वास भाजपने केलेल्या विकासकामांवर असून  शहराचा विकास करण्यासाठी आवश्यक दूरदृष्टी आणि क्षमता भाजपमध्ये आहेत याची नगरसेवकांना जाणीव आहे त्यामुळेच सर्व पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या