शिवसेना - भाजप एकत्र येण्याची आमची इच्छा नाही- आ. पाटील


पुणे

पुण्यात विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हण महासंघाच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गोखलेंनी भाजप - शिवसेना युतीवर भाष्य केले होते.

शिवसेना - भाजप एकत्र येण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले होते. या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
''शिवसेना - भाजप एकत्र येण्याची आमची इच्छाच नाहीये आणि आम्हाला शिवसेनेबरोबर निवडणुकाही लढवायच्या नाहीत असे ते म्हणाले आहेत. बाळासाहेबांबद्दलच माझं प्रेम हे राजकीय प्रेम नाही. शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यासाठी तर हे प्रेम बिलकुलच नाही. प्रेम हे त्यांच्या कर्तृत्वामुळे श्रद्धेपोटी आहे. मी मुंबईत राहतो त्याठिकाणी चारही बाजूने मुस्लिम एरिया आहे. दंगे होयचे तेव्हा शिवसेना आम्हाला सुरक्षित ठिकाणी नारळवाडीत घेऊन जायची. ती शिवसेना आणि या शिवसेनेत फरक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे''

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या