नियाज राजे मित्र परिवामार्फत बाकड्यांचे वितरण..


पारनेर तालुका प्रतिनिधी

पारनेर शहरातील पारनेर नगर पंचायतच्या प्रभाग क्रमांक १० मधे युवा नेते नियाज राजे मित्र परिवारमार्फत १० बाकड्यांचे वितरण करण्यात आले. अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सरयांच्या शुभहस्ते या बाकड्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हापरीषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दातेसर म्हणाले,नियाज राजे मित्र मंडळ, नेहमीच पारनेर नगर पंचायतच्या प्रभाग क्र.१० मध्ये सामाजिक कार्य करत असते. या मधै लाईटचा प्रश्न असो, स्वच्छतेचा प्रश्न असो,अथवा रस्ते मुरमीकरण करणे असो या सर्व कामांसाठी नियाजराजे मित्रमंडळ नेहमीच पुढे आले असल्याचे सभापती दाते यांनी यावेळी बोलताना सांगीतले. याप्रसंगी  सामाजिक कार्यकर्ते रफीक शेख मेजर, बलभिम कुबडे, साहेबराव मातीरे, दिपक धोंगडे, राजेंद्र घोंगडे, साळवे काका, युवानेते दीपक नाईक, योगेश मते, महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे शहराध्यक्ष वसीम राजे,द्योजक मयुर महांडुळे,युवासेना उपशहर प्रमुख रमिज राजे, मंगेश दाते, सुनिल गाडगे, ताहिर शेख शहर अध्यक्ष आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या