पती रुग्णालयात; पत्नीवर सामुहिक बलात्कार!

भोर तालुक्यातील घटना; फिर्यादीच्या पतीवरही बलात्काराचा गुन्हा

molestation

पुणे 

पती रुग्णालयात उपचार घेत असताना दोघा नराधमांनी डाव साधत पीडितेला गोठ्यात गाठून सामूहिक बलात्कार केला. भोर तालुक्यातील भांबवडे गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला.

हा खळबळजनक प्रकार राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पीडित महिलेने शनिवारी (दि.7) फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. अनिल वाडकर, महेश सोनवणे आणि हनुमान कापरे (रा. भांबवडे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. यावेळी पीडित महिलेचे पती शिरवळ येथील एका रुग्णालयात उपचार घेत होते. त्या दरम्यान फिर्यादी शेतात जाताना आरोपींनी फिर्यादीच्या पतीने मोबाईल चार्जर व पँट मागितल्याचे सांगितले. त्यावर स्वत: जाऊन देईन असे पीडितेने सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी तिला धमकी देऊन निघून गेले.

या प्रकारामुळे फिर्यादी घाबरुन शेतातील पिकात लपून बसल्या. सायंकाळी सहा वाजता घरी जाताना गुरांना चारा घालण्यासाठी गोठ्यात गेल्या.

त्यावेळी अनिल वाडकर व महेश सोनवणे यांनी गोठ्यात येऊन पीडितेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला.

याप्रकरणी पीडित महिलेने शनिवारी (दि.7) स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर आरोपीच्या पत्नीने पीडितेच्या नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने ऑक्टोबर 2020 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत भांबवडे आणि कापूरहोळ येथील लॉजमध्ये नेत जबरदस्तीने बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या