पुणे-सिरम ने या वर्षाच्या अखेरपर्यंत एक अब्ज लशीचे डोस उत्पादित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. मात्र, उत्पादन क्षमतेचा विस्तार केल्याने हे लक्ष्य वेळेपूर्वीच गाठले आहे. त्यामुळे लशीची निर्यात पुन्हा सुरू करण्यात आली. कोरोना प्रतिबंधक इतर लशींचे उत्पादनदेखील सिरममध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्यात अमेरिकेतील नोव्हावॅक्सच्या कोव्होवॅक्स लशीचा समावेश आहे. या लशीचा वापरला याच महिन्यात इंडोनेशिया आणि फिलिपिन्सने आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली.कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लशीची पहिली बॅच कोव्हॅक्स यंत्रणेतून बाहेर पडली. कमी आणि मध्यम उत्पन्न देशांमध्ये याचे वितरण करण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या तिमाहीत डोसचा पुरवठा वाढेल, अशी अपेक्षाही सिरमने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केली आहे.
कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्स यंत्रणेतून निर्यात करण्यात शुक्रवारपासून पुन्हा सुरवात झाली, अशी माहिती 'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'ने शुक्रवारी दिली. त्यामुळे जगातील गरीब देशांमध्ये लशीचे डोस उपलब्ध होतील.जगातील अनेक गरीब देशांना कोव्हॅक्स या जागतिक लस वाटपाच्या कार्यक्रमांतर्गत लशी मिळत आहेत.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले, ''कोव्हिशिल्ड लशीच्या उत्पादनाचा एक अब्ज डोसचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. संस्थेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अलौकिक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. मार्चपासून परत लशीच्या उत्पादन सुरू केले. हा जीवरक्षक डोस मिळवून देण्यासाठी सहकार्यांनी अथक परिश्रम घेतले. जगातील कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी पुन्हा लशीच्या निर्यातीस सुरवात करणे, हा एक मोठा क्षण आहे. भारताने कमी किमतीची आणि उच्च गुणवत्तेची औषधे आणि लस कायमच निर्यात केली आहेत. त्यावर जगातील अनेक राष्ट्र अवलंबून आहे. त्यामुळे जागतिक लसीकरणास योगदान देत असल्याने आनंद होत आहे.''
0 टिप्पण्या