कंगनावर केंद्र सरकाने कारवाई करावी

mahesh pasalkar

दौंड

सातत्याने समाज विरोधी बेताल आणि तेढ निर्माण करणाऱ्या कंगना रणावतचे केंद्र शासन लाड करीत आहे. स्वातंत्र्याबाबत बेताल वक्तव्य करून  तिने गंभीर वाद निर्माण केला आहे. केंद्राने कंगनावर कारवाई करावी. अशी मागणी पुणेजिल्हा शिवसेना उपप्रमुख महेश पासलकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.

पासल कर पुढे म्हणाले,  कंगनाने यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत. नुकताच तिने 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक होते. खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. असे बेजबाबदार, बेताल आणि समाज हित विरोधी वक्तव्य केलेले आहे.

यामुळे समाजात तीव्र संताप निर्माण केला आहे.  कंगनाला  शिव सौनिक बाहेर फिरू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या