'ते' मीटर महावितरणने तात्काळ काढले


श्रीगोंदा प्रतिनिधी :- 

श्रीगोंदा शहरातील सरकारी कार्यालयात मीटरमध्ये फेरफार करून मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र याबाबत सरकारी बाबूची हाताची घडी तोंडावर बोट या मथळ्याखाली  वृत्तपत्रांनी बातम्या प्रसारित करताच प्रशासनाला खडबडून जाग आली असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मंडळ अधिकारी कार्यालयातील मीटर तात्काळ काढून नेले आहे. तसेच याबाबत कारवाई करणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.

श्रीगोंदा शहरात तहसील कार्यालयाच्या काही अंतरावर वडळी रोडवर श्रीगोंदा मंडलाधिकारी तसेच श्रीगोंदा तलाठी कार्यालय आहे. या कार्यालयासाठी वीज वितरण कंपनी कडून विजमिटर बसविण्यात आले आहे. मात्र वीजपुरवठा होताना मिटरमधून होत नाही , चक्क खुलेआम मीटरमधून दोन वायरी काढून एकमेकांना पिळा मारून वीजपुरवठा चालू आहे. आता सरकारी कार्यालयात वीजचोरी होत असल्याने यांच्यावर महावितरण नेमकी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत मात्र सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र बातमी प्रसिद्ध करताच प्रशासनाला खडबडून जाग आली असून प्रशासनाने तात्काळ मीटर काढून नेले असून  कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत महावितरणचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जर अशी वीज चोरी कोणत्याही कार्यालयात होत असेल तर याबाबत महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या