शासन आणि जनतेचा दुवा म्हणजे ग्रामीण वार्ताहर - भागिनाथ मगर


वैजापूर 

पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीवर लक्ष ठेऊन निर्भीड लिखाण करून आपली अस्मिता जपावी विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेची गरज असून पत्रकारांनी समाजाचे स्वास्थ्य आणि सलोखा राखायला मदत झालेली आहे .आपल्या परिसरातील माहितीचे सुक्ष्म निरक्षण करावे व जी खरी माहिती आहे ती आपल्या लेखणीतून व्यक्त करावी कारण आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघीतले जात आहे त्यामुळे पत्रकारांनी निर्भिड व निसंकोचपणे आपली लेखणी वापरावी आज आपण राष्ट्रीय पञकार दिन साजर करतो पण ऐक गोष्ट लक्षात ठेवने गरजेचे आहे असे प्रतिपादन कु.ऊ.बा. सभापती भागीनाथ मगर यांनी केले. 

दि 16 रोजी  वैजापुर तालुक्यातील तलवाडा येथे पञकार राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने तलवाडा ग्रामपंचायत येथे पञकारांच्या सत्कार कार्यामाचे आयोजन करण्यात आले होते 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु उ बा सभापती भागिनाथ मगर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून  आरोग्य अधिकारी डॉ.आमिर शेख, ग्रामसेवक आर आर पवार, तलाठी गायकवाड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शांताराम मगर हसन सैय्यद, राधाकृष्ण सोनवणे, सोमनाथ तांबे, सागर कदम, जगदीश निकम, तैमुर सैय्यद, सुजित रंधे, प्रदिप जाधव, दादा तांबे, ज्ञानेश्वर मगर, रामदास मगर, जालीदर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

बोलताना भागिनाथ मगर म्हणाले की, पत्रकार हा वंचित समाजाच्या हितासाठी काम करतो त्यामुळे  समाजालाही आधार वाटतो.  तालुक्यातील राजकारण व समाजकारणात पत्रकारितेच्या माध्यमातून चांगले काम सुरु आहे. तालुक्यातील पत्रकारांचे ग्रामीण विकासात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे राहीले आहे. राजकारणी लोकांच्या ज्या ठिकाणी चुका झाल्या तो विषय बातमी होऊन समाजापुढे येतो. चुका लक्षात आणून दिल्या पाहिजेत, परंतू त्याच बरोबर वस्तुस्थिती जाणून घेऊन पत्रकारांनी न्याय द्यावा अशी अपेक्षा भागिनाथ मगर यांनी व्यक्त केली. 

ग्रामसेवक आर आर पवार बोलताना म्हणाले शासन अनेक कल्याणकारी योजना राबवते,  ह्या योजना आणि उपक्रम लेखणीच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचे महत्वपूर्ण काम वार्ताहार करत असून  वार्ताहाराने नेहमी सकारात्मक लिखाणावर भर द्यावा. अशा सकारात्मक लिखाणामुळे समाजातील अनेक जण प्रेरित होऊन निश्चितच बदल घडवून आणतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. 

मनोगत व्यक्त करतांना शांताराम मगर म्हणाले की शासनाच्या योजनांना गावकुसा पर्यंत पोहचवण्याचे माध्यम म्हणजे ग्रामीण वार्ताहर आहे. दैनिकाच्या पायाभूत श्रोत आहे तसेच समाजातील महत्वाचा घटक हा ग्रामीण वार्ताहर असल्याने माध्यमाच्या बदलत्या प्रवाहाची माहिती वार्ताहरांना होणे गरजेचे आहे. शासन प्रणालीचा चैथा आधार स्तंब समजल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या लेखन स्वातंत्र्यावर गदा येत आहे. पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यावर कडक कायदा करायाला हवा राज्य घटनेने दिलेले आधिकार लेखन स्वातंत्र्य आधारित असावे.

लोकशाही शासन प्रणालीचा चैथा आधार स्तंभ सममजल्या जाणार्या पत्रकाराचे व इलेक्ट्राॅनिक मिडियाचे कार्य एक आव्हान बनत चालले आसुसून त्यांच्या लेखन स्वातंत्र्यावर गदा येत आहे. या दोन्हीच्या संरक्षणासाठी केंद्र किवा राज्य सरकारने कडक कायदा करून पञकारांवर हल्ला करणार्यावर कडक कायदा करायला हवा राज्य घटनेने दिलेले घटनत्मक आधिकार लेखन स्वातंत्र्य आभादित राखावे आसे शांताराम मगर म्हणाले. 

या कार्यक्रमात सुत्रसंचालन आर आर पवार यांनी तर प्रास्ताविक शाताराम मगर यांनीआभार रवि मगर यानी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या