लोणी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, खडकवाडी,शिरदाळे, पहाडदरा, वडगावपीर, मांदळेवाडी, रानमळा आदी गावांना डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे शेतीला पाणी मिळावे या साठी श्री म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समितीच्या वतीने लोणी (ता.आंबेगाव ) येथे रविवार (दिः०७) रोजी शंभू महादेवाच्या मंदीरा समोर कृती समितिच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.व शासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी धामणी,खडकवाडी,शिरदाळे,पहाडदरा, वडगावपीर,मांदळेवाडी,रानमळा परिसरातील शेतकरी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच सागर जाधव, किरण वाळुंज, अनिल डोके, बाळशिराम वाळुंज, उद्धव लंके, पिंटू पडवळ,विठ्ठल सिनलकर, महेश वाघ,कोंडीभाऊ आदक,रंगनाथ जाधव, एकनाथ सुक्रे,अमित वाळुंज, बाळासाहेब वाघ,संजय पोखरकर, आण्णा पोखरकर, निलेश साबळे, तानाजी राजगुडे व वरील सर्व गावचे सरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी उपास्थित होते.आता जोपर्यंत पाणी मिळत नाही.तो पर्यंत आता माघार नाही.हि फक्त सुरुवात आहे.वेळ प्रसंगी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी डिंभे धरणात जलसमाधि,व येणाऱ्या निवडणुका मध्ये बहिष्कार घालणार असल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.
0 टिप्पण्या