दिवाळीसाठी छोटे किल्लेदार सज्ज!

सजावटीसाठी आकर्षक मूर्ती व खेळणी बाजारात उपलब्ध


लोणी काळभोर | विशाल कदम 

 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, मोठी मंडळी खरेदीत व्यस्त आहेत. तर महिला फराळ बनवण्याच्या गडबडीत आहेत. तर बालगोपाळ किल्ले बनवण्यात मग्न झाले आहेत. किल्ल्यांना सजवण्यासाठी अनेक प्रकारच्या आकर्षक मूर्ती व खेळणी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. आजच्या स्मार्ट युगातील या किल्लेदारांची तोफा, हत्ती, घोडे, मावळे विकत घेण्यासाठी बाजारात बालगोपाळांची गर्दी होत आहे.

दिवाळी जवळ आली की, छोट्या मावळ्यांची किल्ले बनविण्याची लगबग सुरु होते. सर्वात देखणा किल्ला आपलाच असावा. यासाठी ही बच्चे कंपनी मेहनत  घेते. सध्या लोणी काळभोरसह परिसरात विविध संस्थेतर्फे 'किल्ला स्पर्धांचे आयोजित करण्यात आले आहेत. किल्ले सजावटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांसह नरवीर बाजीप्रभू, ध्वजधारी, तुतारीवाले, नजराणा आणणारे, पोवाडा गाणारे शाहीर आदींच्या मूर्ती बाजारात आल्या आले आहेत. 

दरम्यान, बाजारात ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत मूर्तींच्या किमती आहेत. मावळे, तोफा, हत्ती, घोडा, उंट, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, यांची खरेदी करण्यासही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारात  रेडिमेड किल्ले विक्रीसाठी आले आहेत. तर शिवनेरी, रायगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड, पन्हाळा, विशाळगड, हरिश्चंद्र गड, राजगड असे किल्ले विविध आकारात उपलब्ध आहेत. या किल्ल्यांच्या किमती २०० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत आहेत. 


किल्ले सजावटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांसह नरवीर बाजीप्रभू, ध्वजधारी, तुतारीवाले, नजराणा आणणारे, पोवाडा गाणारे शाहीर आदींच्या मूर्ती खरेदीसाठी मुलांनी पसंदी दिली आहे. परंतु रेडिमेड किल्ले खरेदीसाठी बच्चे कंपनीचा प्रतिसाद मिळत नाही. 

  - दिलीप शिंदे, विक्रेते : कदमवाकवस्ती (ता. हवेली)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या