खाजगी गाड्यांच्या निषेधात जागरण गोंधळ


पुणे

एसटी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत हे लक्षात घेऊन शासनाने बुधवार पासून एसटी स्थानकांमधूनच खाजगी गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. 

पुणे स्वारगेट एसटी बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी एसटी स्थानकात खासगी ट्रॅव्हल्सला परवानगी दिल्यामुळे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जागरण गोंधळ घालून निषेध केला. त्यामुळे एसटीच्या लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी एसटी चालकांनी जागरण गोंधळ घातला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या