प्रियांका मांगडे ७४०० मतांनी अभूतपूर्व विजयी

काँग्रेसला धक्का


नसरापूर  

पीएमआरडीए  च्या निवडणुकीत भोर ,वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांना धक्का देत भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात मोठा  विजय संपादित केला आहे.

वेल्ह्यातील प्रियांका सागर मांगडे पठारे या ग्रामीण मतदार संघातून जिल्ह्यात सर्वाधिक ७४०० मते घेऊन विजयी झाल्या.

पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सर्वांना एकत्र घेऊन भोर,वेल्हा मुळशी  तालुक्यात निवडणूक प्रचार यंत्रणेचे सुव्यस्थित नियोजन केले होते. हा विजय येथील विकासकामांचा असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व नेते  किरण राऊत यांनी दै.राष्ट्र सह्याद्री  प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

भोर ,वेल्हा ,मुळशी तील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सर्वात मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे .आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या चुरशीने लढल्या जाण्याचे संकेत यातून मिळताना दिसत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या