मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी करीत आत्महत्येचा ईशारा


पुणे

क्रीडा कोट्यातून पोलीस भरती झालेल्या हॉलीबॉल खेळाडूला क्रीडा खात्याकडून प्रमाणपत्राचे व्हेरिफिकेशन वेळेत प्राप्त न झाल्याने नोकरीला मुकावे लागले. महाराष्ट्र हॉलीबॉल संघटनेच्या सचिवांनी वेळेत अहवाल न दिल्याने या खेळाडूला पोलीस भरतीसाठी पात्र असताना अपात्र ठरविण्यात आले. हताश झालेल्या या क्रिडापटूने महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांकडे दाद मागूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर जीवाचे बरे वाईट करण्याचा इशारा दिला आहे.

अभिजित सुरेश हुसळे असे या क्रीडापटूचे नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी आहे. 2016 साली त्याने पुणे विभागाकडून राज्यस्तरीय स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले होते. नागपूर येथे झालेल्या या स्पर्धेचा अहवाल मात्र ऑक्टोबर 2021 पर्यंत पुणे क्रीडा उपसंचालकांना मिळालेला नव्हता. पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस भरतीसाठी हुसळे याने अर्ज केला. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा उत्तीर्ण करून त्याने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. क्रीडा कोट्यातून त्याने या भरतीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे प्रमाणपत्रही जोडले होते. भरतीसाठी त्याची निवड अंतिम झाल्यानंतर त्या प्रमाणपत्राचे व्हेरीफिकेशन मागविण्यात आले. 

त्यासाठी पुणे क्रीडा उपसंचालकांनी हॉलीबॉल संघटनेकडे अहवाल मागितला. तो मुदतीत देणे गरजेचे होते. संघटनेचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मात्र हा अहवाल देण्यास टाळाटाळ केल्याचा हूसळे यांचा आरोप आहे. सूर्यवंशी यांनी त्यांना नियमावली समजावून सांगत 'हवंतर शिक्षण उपसंचालक यांचे माझ्याशी बोलणे करून दे, मी त्यांना सांगतो,' अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अहवाल काही दिला नाही.

29 ऑक्टोबर रोजी हूसळे यांना अपात्र केल्या बाबतचे पत्र पोलीस खात्याने दिल्यानंतर सूर्यवंशी यांनी हुसळे यांना अहवाल घेऊन जाण्यासाठी कोल्हापूरला बोलावले. अपात्र ठरविल्याने निराश झालेल्या हुसळे यांनी मात्र तेथे जाण्यास नकार दिला. मुदत संपल्यानंतर सूर्यवंशी यांनी तो अहवाल क्रीडा उपसंचालकांना मेल केला. क्रीडा उपसंचालक आणि व्हॉलीबॉल संघटना कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त राहिल्याने एका होतकरू, गरजू क्रीडापटूला नोकरी गमवावी लागल्याने क्रीडा क्षेत्रातून राग व्यक्त केला जात आहे. 

या प्रकरणी नेवासा मतदार संघाचे आमदाराने राज्‍याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह क्रीडा मंत्री सुनील केदार गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करून न्याय देण्याची मागणी केली आहे मात्र अभिजित भुसाळे याला अध्यापक कुणाकडूनही प्रतिसाद मिळाला नसल्याने तो हताश झाला असून मला न्याय मिळाल्या मिळाला नाही तर जीवाचे काही बरे-वाईट करील असा इशारा त्यांनी दिला आहे

-----------


 शिक्षणाकडे दुर्लक्ष करून अहोरात्र खेळाचा कसून सराव करायचा, परिस्थिती हालाकीची असतानादेखील त्यावर मात करीत स्पर्धेत गुणवत्ता यादीत स्थान पाटकवायचं, याच आधारावर देश सेवेसाठी झोकून द्यायचं व नंतर संघटनेच्या एका व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे पदावरून पायउतार होणे, या सर्व गोष्टींना कारणीभूत कोण व याची दाद मागावी तर कुणाकडे?

 - पापा शेख , अभिजीतचे कोच


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या