कवठे येमाई
सातत्याने गरिबीचा सामना करीत कष्टप्राय जीवन व्यथित करत कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या अनेक गोरगरीबांना सणसुद फक्त पाहायला व ऐकायलाच. तर अशा गोरगरीबांना ही बऱ्यापैकी मदत करणारे अनेक जण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे अनेक उदाहरणांवरून आपणास पाहावयास मिळते. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना ही या सणाचा आनंद उपभोगता यावा व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे या हेतूने अखिल भारतीय मराठा महासंघ शिरुर शाखेच्या वतीने शिरूर परिसरातील गरीब व गरजू कुटुंबाना एका हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत दीपावली साहित्य किटचे नुकतेच वाटप करण्यात आले.
यावेळी महासंघाचे तालुका अध्यक्ष व शिरुर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे, अहमदनगर जिल्हा परिषद सदस्या कोमलताई वाखारे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला काकू काळे, सरचिटणीस व पतसंस्थेच्या अध्यक्षा अश्विनी (राणीताई) कर्डिले, नगरसेवक विनोद भालेराव, नगरसेविका मनिषा कालेवार, संगिता मल्लाव, रामलिंगचे उपसरपंच अभिलाष घावटे, माजी सरपंच रामदास जामदार, माजी उपसरपंच सागर घावटे,ग्रा. पं. सदस्य यशवंत कर्डिले, उद्योजक बाबा जाधव,वकील रवींद्र खांडरे,सागर नरवडे,सुनंदा लंघे,लता नाझिरकर, आशा पाचंगे, सुवर्णा सोनवणे, शर्मिला निचित, श्रुतिका झांबरे, उज्ज्वला फलके, राणी शिंदे,मनीषा पठारे, छाया हार्दे मनीषा तरटे व अनेक पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी मराठा समाज व महासंघ करीत असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. एक हात मदतीचा या महिला आघाडीच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. उपस्थितांचे स्वागत सरचिटणीस राणी कर्डिले यांनी केले तर आभार अनिल डांगे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन निचित यांनी केले.
0 टिप्पण्या