नसरापूर : (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिल्या जाणारा जिल्हा पातळीवरील सन २०२१ -२२ चा राज्यस्तरीय गुणवंत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार गुंजवणी शिक्षण संस्थेच्या राजे शिवछत्रपती विद्यालय सोंडे माथना वेल्हे येथील मुख्याध्यापक सुभाष आनंदराव वाल्हेकर
व सपत्निक यांना खासदार 'अमोल कोल्हे यांच्या हस्ते वाल्हेकर व हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार राज्यातील जिल्हापातळीवर देऊन प्रत्येक ४८ पुरस्कार्थीची राज्यातून निवड करण्यात आली. या पुरस्कारासाठी वाल्हेकर यांची पुणे जिल्हा पातळीवर निवड झाली असून, ओझर (ता. जुन्नर) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये त्यांना मुख्याध्यापक महामंडळाकडून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुधीर तांबे, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर, अधिवेशन अध्यक्ष डॉ. आर. डी. निकम, जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, सचिव सुरेश कोचन, उपाध्यक्ष उपाध्यक्ष मोहोळ, शिवाजीराव किलकिले, अरुण थोरात, गुंजवणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम खुटवड व सचिव तृप्ती खुटवड उपस्थित होते.
0 टिप्पण्या