हॉटेल राजयोग सुरु होता राजरोस वेश्या व्यवसाय

नगर तालुका पोलिसांचा छापा;  देहविक्री करणाऱ्या दोन मुली ताब्यात व पाच आरोपींना अटक


नगर

नगर तालुक्यातील खंडाळा गावाच्या शिवारात नगर-दौंड रोड वरील हॉटेल राजयोग येथे राजरोस सुरु असलेला कुंटणखाना नगर तालुका पोलिसांनी उध्वस्त केला. यावेळी देहविक्री करणाऱ्या दोन मुली ताब्यात घेताना पाच आरोपींना अटक करण्यात आली. 

नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खंडाळा गावाच्या शिवारातील नगर दौंड रोडवरील हॉटेल राजयोग येथे ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक फौजदार जब्बर रहीम पठाण यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली .

त्यानुसार हॉटेल मालक अक्षय अनिल कर्डिले (वय 25), सौरभ अनिल कर्डिले (वय 21 दोघेही रा. खंडाळा), ग्राहक एजंट विकी मनोहरलाल शर्मा (वय 29 वर्ष रा. आजादनगर आरणगाव रोड ता जि अहमदनगर), गणेश मनोहर लाड (वय 21, वाळकी ता जि अहमदनगर), संदीप पंडित जाधव (वय 23, खंडाळा तालुका जि अहमदनगर) यांना अटक करण्यात आली. दोन पीडितांची सुटका करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या