बसस्थानकात शुकशुकाट..

मात्र बसस्थानकाच्या बाहेर ट्रॅव्हल्स, खाजगी वाहनांचा सुळसुळाट 


बारामती   

बारामतीत सलग दुसऱ्या दिवशी एसटी बंद असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात  कुचंबणा झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही बारामती बसस्थानकात शुकशुकाट पहिला मिळाला आहे. तर  बारामती बस स्थानकाच्या बाहेर मात्र ट्रॅव्हल्स, खाजगी वाहनांच्या सुळसुळाट पहिला मिळत आहे.

राज्य परिवहन महामंडळाचा राज्य शासनामध्ये सहभाग करून घ्यावा, यासह विविध मागण्यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. दरम्यान बारामती आगाराच्या कर्मचाऱ्यांनीही सोमवार (दि.८) रोजी बेमुदत संप पुकारला होता. दरम्यान दुसऱ्या दिवशी ही हा संप सुरूच आहे. जोपर्यंत विलिणीकरण होत नाही, तोपर्यंत हा संप मागे घेणार नाही, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे या आंदोलनामुळे ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांना तिकिट दर दुप्पट आकारून लुबाडले जात आहे. एस टी कामगारांच्या संपाचे लोण बारामतीत ही पसरले असून त्याला पाठिंबा देत सोमवारी सकाळपासून बारामती सह जिल्यातील सर्व आगारांमध्ये संप सुरु झाला आहे. त्यामुळे लाल परीची चाके पूर्णपणे थांबली आहे. बारामतीतील एसटी कर्मचा-यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने (दि:८) पासून सकाळपासून एकही एसटी रस्त्यावर नसल्याने प्रवाशांचे हाल झाले आहे.

सर्वाधिक एसटीची वाहतूक बारामतीहून पुण्याला असते. काल सकाळपासूनच एसटीची वाहतूक थंडावली असल्याने बारामतीच्या बसस्थानकावर येणा-या प्रत्येक प्रवाशाला एक तर प्रवासाचा बेत रद्द करावा लागत आहे किंवा खाजगी पर्यायी व्यवस्था करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आपल्या मागण्यांसाठी राज्यव्यापी सुरु असलेल्या संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्यानंतर ८ नोव्हेंबर पासून कर्मचारी कामापासून दूर राहिले. बारामती व एमआयडीसी अशा दोन्ही आगारांच्या मिळून १२० बसेस आहेत. २५० चालक व जवळपास २२० वाहक या आगारात कार्यरत असून जवळपास बारा हजार प्रवाशांची दररोज या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात वाहतूक होते. सामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणून ओळखणाऱ्या लालपरीचे चाक थंडावल्याने दोन दिवसात अनेक प्रवाशांचे हाल झाले.

"विविध मागण्यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. बारामतीत देखील त्याचे पडसाद उमटले आहेत. आज पहिल्यांदाच बारामती बस स्थानकात शुकशुकाट पाहावयास  मिळाला. राज्य शासनाने लवकरात लवकर राज्य परिवहन महामंडळाच्या मागण्या पूर्ण  करून सर्वसामान्य प्रवाशांची यातून सुटका करावी"

- प्रवासी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या