तहसीलदारांची उपोषणास भेट....

सहाव्या दिवशी उपोषण सुरुच


बोधेगाव 

मुलाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पोलिसांवर कारवाई होण्यासाठी सहा दिवसापासून आदित्यची आई व कुटुंबीय उपोषणास बसलेले आहेत. आज सहाव्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक सांगण्यात येत आहे. तरीही प्रशासनाला अजूनही जाग आली नाही.

दरम्यान तहसीलदार  छगनराव वाघ, नायब तहसीलदार रमेश काथवटे, बोधेगावचे मंडळाधिकारी भाऊसाहेब खुडे, तलाठी किशोर पवार यांनी भेट देऊन उपोषण कर्त्या संगीता भोंगळे यांच्या सोबत उपोषण बाबत चर्चा करण्यात आली तसेच त्यांची समजूत देखील काढण्यात आली परंतु चर्चेअंती कुठलीही ठोस भूमिका निघाली नसल्याने कोणताही तोडगा निघाला नाही.

यावेळी माजी सरपंच रामजी अंधारे, माजी सभापती भाऊराव भोंगळे, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास भोगले, राजू इंगावले, कुंडलिक घोरतळे, सुगंध खंडागळे, गौतम भोंगळे, भाऊसाहेब मासाळकर, भास्कर पटवेकर,  यांच्यासह आदी ग्रामस्थ तसेच समाज बांधव उपोषण स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 उपोषण कर्त्या संगीता भोंगळे यांचा रक्तदाब कमी होत चालला असून, शरीरामधील पाण्याची पातळी देखील  कमी होत चालली आहे. त्यामुळे रुग्णाला औषधोपचार तसेच हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची अत्यंत आवश्यकता असून, रुग्णांचे वजन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. या परिस्थितीत उपोषण कर्त्यानी अन्न व पाण्याची सेवन न केल्यास आणि औषधाला नकार दिल्यास त्यांच्या जीवितास कुठल्याही क्षणी धोका निर्माण होऊ शकतो.

-  डॉ.दीपक परदेशी-वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय बोधेगाव


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या