व्यापाऱ्यांची दिवाळी गोड, बाजारात कोटीची उलाढाल


पुणे प्रतिनिधी

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापारी वर्गाला दिवाळीत ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे दिलासा मिळाला. या कालावधीत बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तु, वाहने खरेदीला गती मिळाली.

गेल्यावर्षी मार्च महीन्यात कोरोनाची लाट आल्यानंतर देशभरात लॉकडाऊन लागू केले गेले. कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या निर्बंधांचा परीणाम व्यापार, व्यवसायांवर झाला होता. कोरोनाची भिती कायम राहील्याने गेल्यावर्षी दिवाळीत आर्थिक उलाढाल कमीच राहीली होती. यावर्षी फेब्रुवारी महीन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा एकदा निर्बंध लागू केले गेले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. लसीकरणाला मिळालेल्या गतीनंतर कोरोनाची लाट नियंत्रणात येऊ लागली. परंतु व्यापार, व्यवसायाला गती मिळाली नव्हती. यंदाची दिवाळी मात्र, व्यापाऱ्यांना दिलासा देणारी ठरल्याचे मत व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी असे मत व्यक्त केले.

दिवाळीत नागरीकांनी खरेदीसाठी बाजारपेठांत मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मोठ्या शो रुम्सपासून ते पथारीवाल्यांसमोर ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. कपड्यांमध्ये विशेषत: लहान मुलांच्या आणि साड्यांच्या खरेदीला पसंती मिळाली. इलेक्ट्रॉनिक वस्तुच्या बाजारात टीव्ही, रेफि्रजरेटर यांची खरेदी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले. वाहन खरेदीमध्ये इलेक्ट्रीक आणि हायब्रीड प्रकारातील वाहनांकडे नागरीकांचा कल वाढत असल्याचे दिसून आले. तर सोने आणि चांदी खरेदीमध्ये गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला.

चौकट

* '' मुहुर्तावरील खरेदीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचे दागिणे आणि चांदीच्या भेटवस्तुंची चांगली विक्री झाली. बाजाराच्या उलाढालीला गती मिळाली''.

-फत्तेचंद रांका, अध्यक्ष, 

पुणे सराफ असोसिसएशन आणि पुणे व्यापारी महासंघ.

चौकट

* '' लसीकरणाचे प्रमाण वाढल्याचा सकारात्मक परीणाम दिवाळीच्या खरेदीत दिसून आला. दुकानदार व नोकरांचे लसीकरण चांगले झाले होते. कोरोनाविषयीची भिती कमी झाल्याने नागरीक खरेदीसाठी बाहेर पडले होते.''

-नितीन पंडीत, 

अध्यक्ष, 

तुळशीबाग व्यापारी असोसिएशन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या