अण्णा हजारे तंदुरुस्त, राळेगणसिध्दीकडे रवाना..

सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल.



( पारनेर तालुका प्रतिनिधी ) : - ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काल नियमित वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथे रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल झाले होते. काल सर्व मुख्य तपासण्या करण्यात आल्या होत्या.त्यांच्या उर्वरित सर्व तपासण्या आज सकाळी करण्यात आल्या.

सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याने वयाच्या ८५ व्या वर्षीही अण्णा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉ. परवेझ ग्रँट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगीतले आहे.नियोजित सर्व तपासण्या पूर्ण झाल्याने काही वेळापूर्वी डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार अण्णा राळेगणकडे रवाना झाले आहेत.दरम्यान अण्णा रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू,राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री ना.अशोक गेहलोत यांच्यासह अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपुस केली.अण्णांच्या सोबत स्वयंसेवक श्यामकुमार पठाडे व संदीप पठारे आहेत.

अण्णांना रुग्णालयातुन निरोप देण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकची संपूर्ण टिम उपस्थित होती.डॉ.परवेझ ग्रँट,डॉ.मखळे,डॉ. मुनोत यांनी अण्णांच्या सर्व तपासण्या केल्या. काही दिवस अण्णांना संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्याने किमान एक आठवडा तरी कार्यकर्त्यांनी अण्णांना भेटण्याचा आग्रह धरू नये अशी माहीती अण्णांच्या कार्यालयातुन देण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या