दौंड
एस, टी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय अतिशय अडचणीतुन जात असून अशा कठिण प्रसंगी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पाठिमागे सर्वांनी उभे रहाणे, जरूरीचे असल्याचे मत भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आणि स्वच्छ भारत अभियान पुणे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल शहा यानी दौंड एस, टी, आगार येथे कामगार वर्गापुढे बोलताना व्यक्तकेले आहे.
शहा यानी सवखर्चने दौंड आगार मधील सर्व कामगार याना पोशाख , मिठाई, आणि कामगरांच्या मुलाना शालेय साहित्य भेट दिले, दौण्ड एस, टी, आगार कामगार दिवाळी पासून सम्पावर आहेत. यामुळे कामगार आणि त्यांचे कुटुंबिय अतिशय अडचणीच्या परिस्थिती मधून जात आहे, परिस्थितिला कंटाळून 35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनाने एस, टी, कर्मचारी यांच्या मागण्या सहानुभूति पूर्वक मान्य कराव्यात. शासनाने कामगार यांचा विचार करून त्याचे पाठी मागे उभे रहावे.
यावेळी स्वप्निल ठानगे, राहुल भंडारी, सचिन महामुनी, उमेश तूप सौंदर्य, रवींद्र बंड, जावेद अख्तर, पपु शिंदे आणि कार्य कर्ते उपस्थित होते,
0 टिप्पण्या