आता शेतमजुरांनाही मिळणार अपघात विम्याचे कवच



मुंबई : शेतकऱ्यांबरोबर आता शेतमजुरांनाही अपघात विम्याचे कवच राहणार आहे. याकरिता केंद्र सरकारने ‘ई-श्रम योजना’ ही सुरु केली आहे. देशातील असंघटित कामगार व मजुरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एवढेच नाही तर शेतामध्ये कोणत्याही प्रकारची मजुरी करणाऱ्यालाही याचा लाभ घेता येणार आहे. नोंदणीकृत मजुरांना 2 लाखापर्यंतचा अपघाती विमा मिळणार आहे.

केंद्र सरकारने नव्याने सुरु केलेल्या योजनेची माहीती अद्यापही अनेकांना नाहीच. आतापर्यंत ग्रामीण भागात केवळ स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही माहिती होती. पण ई-श्रम योजनेबद्दल अनेकजण अनभिज्ञ आहेत. मात्र, या योजनेमुळे असंघटित कामगार व मजुरांना फायदा होणार आहे.

आता  पर्यंत देशात 8 कोटी मजुरांचीच नोंदणी  ‘ई-श्रम योजना’ मध्ये नोंदणी केली आहे तर देशभरात 38 कोटींवर मजुरांची संख्या आहे. मात्र, या योजनेचा अद्यापही प्रचार आणि प्रसार झालेला नाही. त्यामुळे केवळ 8 कोटी मजुरांचीच नोंदणी केंद्र सरकारने दिलेल्या पोर्टलवर झालेली आहे. महाराष्ट्रात प्रशासनाला 12 लाख नोंदणीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. पैकी केवळ 52 हजार मजुरांची नोंदणी झालेली आहे. नोंदणी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये असलेल्या मजुरांची नोंदणी करुन त्यांना लाभ मिळवून दिला पाहिजे.केंद्राच्या ‘ई-श्रम’ योजनेमध्ये शेती व शेतीसंलग्न क्षेत्रातील मजुरांना तसेच रोजगार हमी योजनेतील मजूर, बांधकाम क्षेत्र, मासेमारी, रोजंनदारी करणारे मजूर, फलाटावर काम करणारे मजूर तसेच फेरीवाले, घरकाम करणारे यांनाही सहभागी होता येणार आहे. दूध-चहा, भाजीपाला विक्रेते अशा तब्बल 300 व्यवसायिकांना ही योजना लागू करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या