शरदवाडीचे सरोदे राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच पुरस्काराने सन्मानित


कवठे येमाई 

शिरुर तालुक्यातील जांबुत,शरदवाडी गावचे माजी उपसपंच गणेश सरोदे यांनी आपल्या उपसरपंच पदाच्या कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पुणे येथील सर्च मराठी ग्रुप व मिडिया फाऊंडेशनच्या वतीने सरोदे यांचा राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच पुरस्काराने गौरव करण्यात आला. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते हा पुरस्कार सरोदे यांना जिल्हा परिषद पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. 

 यावेळी जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,राज्य ग्राहक परिषदचे नाथा शेवाळे, डॉ पुजा चोपडे, उद्योजिका डॉ सुमित्रा भोसले,कार्यकारी संपादक स्वप्निल वर्जाडे व शरदवाडीतील मान्यवर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.  

शिरूर तालुक्यातील जांबूतच्या शरदवाडी सारख्या अत्यंत छोट्याशा गावातील असलेले गणेश सरोदे हे तरुण असून समाजसेवेची आवड व विकासात्मक कार्य करण्याची त्यांची चिकाटी त्यामुळे अल्पावधीत त्यांनी लोकप्रियता मिळवत सन २०१५ ते २०  मध्ये जांबूतचे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच पदापर्यंत पोहचले. ग्रामपंचायत मध्ये प्रतिनिधित्व करताना आपल्या शरदवाडी गावातील नागरिकांना अधिकाधिक सेवा सुविधा मिळवून देण्याचा सरोदे यांनी सातत्याने प्रयत्न केला. याच भूमिकेतून त्यांनी शरदवाडीत अंतर्गत रस्ते,अनेक ठिकाणी हायमँक्स दिवे,डिजीटल शाळा,शाळा दुरूस्ती,अंगणवाडी सुशोभीकरण,स्मशानभूमीइत्यादी विकासात्मक कामे प्राधान्याने मार्गी लावली. महत्वाचे म्हणजे जांबुत ग्रामपंचायतमधुन शरदवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी साठी ग्रामस्थांना बरोबर घेत शासन दरबारी अतिशय चिकाटीने यशस्वीपणे पाठपुरावा केला.याच यशस्वी प्रयत्नातून  शरदवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आली. 

शिरूर,आंबेगावचे आमदार तथा या भागाचे प्रतिनिधी व राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, जांबूतच्या माजी सरपंच डॉ. जयश्री जगताप यांच्या माध्यमातून जवळपास पावणेदोन कोटी रुपयांची विविध विकास कामे सरोदे यांनी केली.  त्यांच्या या उत्कृष्ट व समाजहिताच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सर्च मराठी ग्रुप व मिडिया फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच पुरस्काराने गौरव करण्यात आला.गणेश सरोदे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या