कुट्टी मशीन मध्ये ओढणी अडकल्याने नवविवाहितेचा मृत्यू


प्रतिनिधी  निरगुडसर 

जनावरांसाठी कुट्टी करत असताना मशीनमध्ये ओढणी गुतून गळफास लागल्यामुळे 21 वर्षीय नवविवाहीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या बाबतची फिर्याद सुभाष दौड यांनी दिली आहे.

सोनाली अजय दौंड, वय 21 रा.लाखनगाव गव्हाळी मळा ता.,आंबेगाव पुणे असे या नवविवाहीत महिलेचे नाव असून सोनालीचा विवाह गेल्या नुकताच झाला होता. सोनाली जनावरांसाठी चारा तयार करण्यासाठी कुट्टी मशीनमध्ये चारा टाकत होती. दरम्यान तिच्या गळ्यातील ओढणी व केस मशीनमध्ये गुंतल्याने तिला गळफास लागला. घरच्यांनी तिला कुट्टी मशीन मधून काढून रुग्णवाहिका द्वारे पारगाव इथून पुढे उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. सहा महिन्यापुर्वी विवाह झालेल्या सोनालीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान याबाबत सुभाष सोपान दौंड यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली असून घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक खैरे करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या