अट्टल वाहनचोर जेरबंद


भोर 

तालुक्यातील भोर - महाड मार्गावर चोरीची रिक्षा घेऊन पलायन करणाऱ्या अट्टल वाहन चोरट्यास भोर पोलिसांनी आज (दि २१) रोजी नांदगाव परिसरात जेरबंद केले आहे.रवि बाळासाहेब धोत्रे (वय ३०) रा.रांजे ता.भोर असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव असून त्याने पुणे शहर आणि परिसरात वाहन चोरीचे अनेक गुन्हे केल्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,आरोपी रवी धोत्रे याने तालुक्यातील भोलावडे परिसरातून संतोष गवळी यांचे मालकीची रिक्षा क्रमांक एम एच १२ क्यू आर ४२७९ चोरली होती.चोरीची रिक्षा घेऊन धोत्रे महाडकडे जात असल्याची खबर पोलीस हवालदार अमोल मुऱ्हे यांना मिळताच पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल मुऱ्हे ,शौकत शेख,यशवंत शिंदे,सोनल इंगुळकर,वर्षा भोसले यांच्या पथकाने भोर महाड मार्गावर चित्रपटातील दृश्यात शोभेल असा १० ते १२ किलोमीटर पाठलाग करून आरोपीस ताब्यात घेतले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या