Breaking News

ऊसतोडणी कामगारांची दिवाळी यंदा फडातच साजरी


अजनुज प्रतिनिधी

या वर्षीची दिवाळी मात्र ऊस तोडणी कामगारांची उसाच्या फडात साजरी करण्याची वेळ आली आहे. आठरापगड विश्व दारिद्रय पदरी असल्याने ऊस तोडण्याची वेळ आली असून वाढती कारखान्यांची संख्या लक्षात घेता मोठी स्पर्धा असून आपला कारखाना अगोदर कसा सुरु होईल या दृष्टिकोनातून दिवाळीच्या अगोदरच ऊस तोडणी कामगारांची जुळवा जुळव करावी लागते.

दसरा झाल्याबरोबरच ऊसतोडणी कामगार आणण्यासाठी जावे लागते म्हणजे कोठे तरी कामगार दिवाळीच्या अगोदर येत असतात.या कामगारांची गोड दिवाळी आपल्या गावी न साजरी करता ऊसाच्या फडात साजरी करण्याची वेळ आली आहे.या कामगारांच्या बाबतीत ऊन,वारा,पाऊस,थंडी यांना सामोरे जावे लागत असून लहान मुलं देखील त्यांच्या बरोबर ऊसाच्या फडात वावरताना दिसून येतात.जी परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीला तोंड देत दोन पैसे पोटाला कसे मिळतील याच आशेवर यांचे जीवन आहे.


No comments