राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन


बारामती 

जळोची मधे कोव्हीड १९ विरहीत पर्यायी स्मशानभूमीचे बांधकाम करणे बाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने (दि:११) रोजी बारामती नगरपरिषद कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कृत्रिम प्रेताला अग्नी देऊन नगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

यावेळ क्रृञीम प्रेताचे दहण नगरपरिषद कार्यालया समोर करण्यात आले. आमच्या मागणीची दखल घेतली गेली नाही तर येथुन पुढे जळोची गावातील मयत झालेल्या प्रेताचे नगरपरिषद कार्यालया समोर त्या प्रेताला अग्नी देऊ. असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आला. या प्रसंगी नगरपरिषदेचे मुख्यधीकारी यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते संदीप चोपडे तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर, चंद्रकात वाघमोडे, महादेव कोकरे, रेवण कोकरे,अविनाश मासाळ,किशोर सातकर, शैलेष थोरात , निखील दांगडे, सुधीर वाघमोडे, प्रमोद धायगुडे, निलेश सातकर, करण गोसावी, भुषण सातकर आदी उपस्थित होते..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या