३७ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग.!!


लोणी-धामणी  प्रतिनिधी

येथे श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशाला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिपावलीचे औचित्य साधून १९८४ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी गृहविभागाचे सहसचिव कैलास गायकवाड,माजी प्राचार्य स.ल. शिंदे, प्राचार्य अरुण साकोरे,बाबाराजे वाळूंज व १९८४ च्या बॅचचे विद्यार्थी राज्यकर उपआयुक्त अरिप मुलाणी, पीडीसी बॅकेचे चीफ ऑफीसर विष्णू गायकवाड,पीएसआय राजाराम पवळे व राजाराम पोपळगट,मुखाध्यापक कांतीलाल दंडवते, शामा पारेख, सुमन वाळुंज, विठठल सुक्रे, दौलत गुळवे, मोहन सिनलकर, बाळासाहेब आदक,एकनाथ शिंदे, सुरेश खंडागळे, प्रकाश राजगुडे, ज्ञानेश्वर आदक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गमती-जमती व आपल्या जीवनाचे अनुभव सांगून जुन्या गोष्टींना उजाळा देताना मात्र माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्याच्या कडा पानविल्या होत्या. यावेळी १९८४ च्या माजी विद्यार्थ्यांनी बांधकाम चालू असलेल्या इमारतीसाठी ७५००० रुपयाची देणगी दिली.तर याच विद्यालयातील सेवानिवृत शिक्षक दादाभाऊ गावडे यांनी २५००० रुपयांची देणगी दिली.  शेवटी गोड जेवणाचा अस्वाद घेऊन पुन्हा एकदा एकमेकांना भेटण्याचे पक्के ठरून निरोप घेतला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या