सोनईकर खमक्या अधिकाऱ्याच्या प्रतिक्षेत


पानेगाव वार्ताहर-:  

जिल्ह्यात संवेदनशील म्हणून ओळख असणाऱ्या सोनई पोलीस ठाण्याला खमक्या अधिकाऱ्याबरोबरचं कायद्याचे नाॅलेज असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. शुक्रवार दि.२६ रोजी सुरुवातीपासून वादग्रस्त, सपोनि रामचंद्र कर्पे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्याचें कारनामे पाहून तातडीने कंट्रोल जमा केले. उशिरा का होईना कर्पे यांना कंट्रोल जमा केल्याने सर्व सामान्य जनतेबरोबर सामाजिक कार्यकर्ते, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी  सोशल मिडीयावर आनंद व्यक्त करुन पेढे वाटून पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांचे आभार मानले.

कर्पे सोनई पोलीस चार्ज घेतल्यापासून नेहमीच वादग्रस्त ठरले त्यांच्या कार्यकाळात एकही तपास पुर्ण झालेला नाही.

२९ गावांच कार्यक्षेत्र असून ३४ कर्मचारी बरोबरच दोन अधिकारी येथे कार्यरत आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांनी कर्पे यांच्या कालखंडात केलेल्या कामाची चौकशी करून काॅल डिटेल्स तपासून अवैध धंदे तसेच नेहमीच आरोपींना पाठीशी घालूण गुन्हेगारी क्षेत्रातील डेरिंग वाढण्याच्या कामाला प्रोत्साहन दिल्याचं उघड होणार आहे. तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी राजरोसपणे पोलीस ठाण्यात नेहमीच उठबसं होतं असायची.

जमिनीचे वाद कसे निर्माण होतील आणि ग्राहकात कसं रुपांतर होईल यासाठी काही कर्मचारी कर्पे यांनी कामाला लावले होते. अर्थ पुर्ण व्यवहार झाला की, फौजदारी,आणि अर्थिक लाभ न झाल्यास दिवाणी असा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांची लुट येथे झाली.

सपोनि रामचंद्र कर्पे यांनी एन.सी गुन्हात काहीच कारवाई होत नसल्याचे सांगत फिर्यादीची बोळवण करत असे,मग एक एन सी दाखल करण्यासाठी जवळपास ४० मिनिटांचा कालावधी लागतो मग पोलीस प्रशासन एन सी कारवाई करुन वेळ कशाला घालवत असेल असा प्रश्न पडतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या