Breaking News

सेवा समाप्ती पत्राने कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटकापुणे-
गेल्या २० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून अद्याप त्यावर ठोस असा तोडगा निघाला नाही. अशातच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली असून शिवाजीनगर डेपोमध्ये काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याला सेवा समाप्तीचे पत्र आल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला.मारुती घडसिंग असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. एस टी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी शिवाजीनगर डेपो येथे आंदोलनाला मध्ये बसलेले असताना अचानक घडसिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना घरी नेण्यात आलं. धानोरी परिसरामधील रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments