पोलिसांकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त : एकास अटक




बारामती - अग्निशस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी प्रताप अमरसिंग पवार (वय २१ वर्ष) (रा: बागमळा जिल्हा खंडवा,मध्यप्रदेश) (सध्या राहणार महादेव मळा पाटस रिंग रोड, सुरंजन हॉटेल जवळ) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या जवळील एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅक्झिन व दोन ७.६५ ची जिवंत काडतुसे असे एकूण २५ हजार १००  रुपयांचा मुद्देमाल बारामती शहर पोलिसांनी जप्त केला आहे.

 पुणे ग्रामीण जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यांमध्ये अनेक गुन्हेगार अग्नी शास्त्राचा वापर करत आहेत. तसचे जवळ बाळगत आहे. यासाठी तीव्र मोहीम घेण्याबाबत वेळोवेळी लेखी तसेच बैठकांमध्ये तसेच सोशल मीडिया मार्फत पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पोलीसांना आदेश दिले होते. त्या आदेशान्वये बारामती शहर पोलिसांतर्फे रेकॉर्डवरील पूर्वी अग्नी शास्त्राचे गुन्हे दाखल होणारे गुन्हेगारांची चेकिंग मोहीम सुरु केली. या मोहीम दरम्यान तपासणी सुरू असताना.पोलीस नाईक दशरथ कोळेकर यांना माहिती मिळाली की आरोपी प्रताप अमरसिंग पवार ( रा: बागमळा जिल्हा खंडवा मध्य प्रदेश) सध्या राहणार महादेव मळा पाटस रोड रिंग रोड सुरंजन हॉटेल जवळ राहत आहे. हा लेबर कॉन्ट्रॅक्टर स्वतःजवळ एक अग्निशस्त्र बाळगून आहे ही माहिती मिळताच बारामती शहर पोलीस सदर ठिकाणी त्याच्यावर छापा मारला असता  त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅक्झिन व दोन ७.६५ जिवंत काडतुसे असे एकूण पंचवीस हजार शंभर रुपयाचे मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर आरोपीची अधिक चौकशी केली असता तो  मूळ मध्य प्रदेश येथील असल्याने त्याने सांगून तिथूनच त्याने हे हत्यार आणल्याचे सांगितले. त्याने आणखी कुणाला हत्यार विक्री केले आहे का... तो लेबर लोकांना धाक दाखविण्यासाठी याचा वापर करत होतो का... याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

 सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, मनोज पवार अभी कांबळे व संपूर्ण तपास पथकाने केली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या