कच्च्या तेलाचे भाव घसरले, भारतामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर



नवी दिल्ली : आतंररारष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने कमी होत आहेत. कच्च्या तेलाच्या किमीतमध्ये गेल्या दोन दिवसांत तब्बल 11.55 टक्क्यांनी घट झाली असून, त्याचे दर 72.72 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. युरोपमध्ये अद्यापही कोरोनाचे सावट कायम असल्याचे पहायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून कच्च्या तेलाचे भाव घसरल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान जरी कच्च्या तेलाचे भाव घसरले असले तरी देखील भारतामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

साधारणपणे कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर अवलंबून असात. कच्च्या तेलाचे दर वाढले की पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात आणि दर कमी झाले तर इंधनाचे दर देखील कमी होतात. भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलचा दर 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या