पुणे
हडपसरमधील साडेसतरानळी येथील एका डेकोरेशनच्या सामानाच्या एका गोदामाला पहाटे तीन वाजता भीषण आग लागली. या आगीत गोदामातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून राजू भीमसेन काळे असे त्याचे नाव आहे. राजू काळे हे दोन्ही पायांनी अपंग होते.
हे गोदाम लोकवस्तीमध्ये असल्याने ही आग पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी चार तासांमध्ये आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाच्या चार आगीच्या बंबाने अथक परिश्रमानंतर ही आग विझवली आहे. घटनास्थळी हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस व पीएमआरडी व अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख शिवाजी चव्हाण उपस्थित होते.
0 टिप्पण्या