अखेर कारखाना रेल्वे गेट रस्त्याची डागडुजी सुरू


लिंपणगाव प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट या अडीच किलोमीटर रस्त्याची डागडुजी सुरू करण्यात आल्याने प्रवासी व वाहनचालकांना मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान लिंपणगाव ते सहकार महर्षी नागवडे कारखाना रेल्वे गेट हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे सामाविष्ट आहे. हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. त्यामध्ये सहकारमहर्षी नागवडे कारखान्याकडे हा रस्ता मार्गस्थ होतो. गाळप हंगामामध्ये रस्त्यातून ऊसतोड बैलगाड्या तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर या रस्त्यातून दररोज ये-जा करत असतात. परंतु हा रस्ता खड्डेमय बनल्यामुळे रात्री-अपरात्री रस्त्यातून अपघाताला निमंत्रण मिळते. त्यातून दुर्दैवी अपघात घडतात त्यामध्ये अपघात झाल्यानंतर वाहतूकही देखील विस्कळीत होते. ही सर्व पार्श्वभूमी पत्रकारांनी पंचायत समितीचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता जगताप यांना समजावून सांगितली. त्यानंतर त्यांनी दोनच दिवसांमध्ये खड्डे बुजवण्याचे काम संबंधित ठेकेदाराला देऊन रस्त्याची डागडुजी सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रवासी वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबरोबरच आता साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाल्याने व ऊस तोडणी साठी लगबग सुरू झालेली आहे. अशा परिस्थितीत ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी व ट्रॅक्टर चालकांना रस्ते सुरळीत असेल तर कुठल्याही प्रकारचे अपघात न होता ऊस वाहतूक आदी जलद गतीने होते. सहकार महर्षी नागवडे कारखान्याच्या काही अंतरावरील असणारा लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट या रस्त्याची मोठी दुरवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे स्थानिक पत्रकारांनी संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता जगताप यांनी या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणाऱ्या रस्त्याची पार्श्वभूमी समजावून घेतल्यानंतर, त्यांनी तात्काळ रस्त्याची डागडुजी व्यवस्था करून गेल्या दोन दिवसापासून या रस्त्यात मोठमोठे खड्डे बुजवून त्यामध्ये कारपीट व डांबर टाकून हा रस्ता सुरळीत केला जात आहे. दरम्यान 7 नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्याबरोबरच काही मंत्रीगण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तीदेखील बाब स्थानिक पत्रकारांनी उपअभियंता  जगताप यांना सांगितल्यानंतर तातडीने या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात पाऊल उचलण्यात आले. उपअभियंता जगताप यांनी या कामास प्रतिसाद देऊन घेतलेल्या निर्णयाबद्दल नागवडे कारखाना प्रशासन तसेच प्रवासी, वाहन चालक, सभासद ऊस उत्पादकांनी जगताप यांना धन्यवाद दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या