कर्जत
प्रथम नगराध्यक्ष यांनी आ रोहित पवार यांचे विकासाचे राजकारण पाहता राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशाने निश्चित कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली असून आगामी कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत याचा फायदा पक्षाला मिळणार असल्याचे सुतोवाच कालच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये चैतन्य संचारले आहे.
शनिवारी विविध विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत दौऱ्यावर होते. महाविकास आघाडी आयोजित जाहीर सभेत अजित पवार यांनी नुकतेच भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांची आपल्या भाषणात प्रशंसा केली. त्यांच्या भाषणातील कौतुकाने अनेक उपस्थिताच्या भुवया उंचावल्या गेल्या. नामदेव राऊत कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष असून त्यांनी कर्जत नगरपंचायतीमध्ये आपल्या कार्यकाळात विकासकामे करून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यासह त्यांनी कर्जत शहर आणि अनेक प्रभागाचा उत्तम विकास करून चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने निश्चित पक्षाला फायदा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात राऊत यांचा उल्लेख केल्याने त्यांचे राजकीय वजन दर्शवले.
यासह राऊत ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे कर्जतमधील एकमेव नेते असल्याने त्यांच्याकडे राजकीय दूरदृष्टी आहे. तसेच ते कर्जत शहरातील नागरिकांमध्ये आपल्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळातील कार्याने घराघरात पोहचलेले आहेत. त्यांच्या स्नुषा नगरसेविका उषा अक्षय राऊत देखील महिला वर्गामध्ये उल्लेखनीय कार्य करीत असल्याने सर्व कर्जतकरांना परिचित आहे. नामदेव राऊत यांच्या कार्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये केल्याने राऊत समर्थकामध्ये उत्साह संचारला आहे.
0 टिप्पण्या