बदलत्या हवामानामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ


अजनुज प्रतिनिधी

बदलत्या लहरी हवामानामुळे बळीराजाच्या चिंतेत दिवसेनदिवस वाढ होत चालली पाहवयास मिळत आहे.कोणती पिके कशी घ्यावीत?हा एक बळीराजा समोरील चिंतेचा विषय बनला असून हिवाळा आहे की पावसाळा हेच न समजणारे कोडे बनले आहे.अचानक तपमानात वाढ होते तर काही वेळेस थंडी गायब होते याचा फटका पिकांना बसत आहे.

गेल्या वर्षी पासून तर कांदा पिक घेणे तर काटेवरची कसरतच बनली आहे.मुळ कुज सारखा नविनच रोग आला असून त्यात बळीराजाला चांगलाच आर्थिक फटका बसत आहे.थोडासा पाऊस झाला की कांदा रोप नष्ट होण्याच्या मार्गावर असतात. सध्या तरी गहू पेरणीचा हंगाम असून थंडी तर गायब असल्याने पेरणी करण्यात बळीराजाला अडचणीला सामोरे जावे लागत आहे.हरबरा पिकासाठी सुध्दा हिच अडचण होवून बसली आहे.खतांच्या वाढत्या किंमती तसेच वीजचे वेळापत्रक बळीराजाला कोलमडून टाकणारे आहे.रात्री जर पिकाला पाण्यातून हयुमिक सोडायचे झाले तर अंधारात चाचपडत पाणी धरावे लागते.शेतात पिके कोणती आणि कोणत्या वेळी घ्यावी या बाबत बळीराजाला कृषी मार्गदर्शन करण्याची आता गरज आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या