संस्कृत महाविद्यालयाचे आळंदीत उद्घाटन


आळंदी 

श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे विद्यार्थ्यांना प्रथमच सर्व प्रकारच्या संस्कृत शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय मान्यताप्राप्त श्री ज्ञानराज वेदांत गुरुकुलम् या संस्कृत महाविद्यालयाचे उद्घाटन अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष श्रीगुरु स्वामी गोविंदगिरी महाराज आणि शांतिब्रह्म हभप मारुती महाराज कुरेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त माणिक महाराज मुखेकरशास्त्री, बाजीराव नाना चंदिले गुरुजी, हभप आसाराम महाराज खांदवे, रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर, मच्छिंद्र गडाचे मठाधिपती स्वामी जनार्दन महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज शिंदे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सदस्य अनिल वडगावकर, हभप पृथ्वीराज महाराज जाधव,आदिनाथ महाराज सटले, आनंद वडगावकर, शरद गलधर, दादासाहेब करंडे उपस्थित होते.

श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे उद्घाटन झालेले ज्ञानराज वेदांत गुरुकुल संस्कृत महाविद्यालय हे प्राचीन गुरुकुल पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना अध्यात्मिक,सांस्कृतीक विकासाकरिता नित्य कार्यरत असते, या गुरुकुलात वारकरी प्रस्थानत्रयीचे अर्थात ज्ञानेश्वरीच,गाथा व भागवत त्याचप्रमाणे लघु प्रस्थानत्रयीचे अर्थात गीता,दशोपनिषद व ब्रह्मसूत्र आणि तसेच ब्रहद्द प्रस्थानत्रयीचे अर्थात चित्मुखी,खण्डनखण्डन,अव्दैतसिध्दि यासारख्या प्रमुख ग्रंथ यांचे शिक्षण गुरुकुलात परंपरेने दिले जाते याकरिता आवश्यक प्रकरण ग्रंथ सुद्धा शिकवले जातात,इयत्ता पाचवी ते पद्व्युत्तर पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत संस्कृतचे शिक्षण दिले जात असल्याचे श्री ज्ञानराज वेदांत गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष श्रीस्वामी हनुमान चैतन्य महाराज यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या