मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला दुर्मिळ जातीचा मासामांडवगण फराटा :शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील भिमा नदी पात्रात मच्छीमारांच्या जाळ्यात दुर्मिळ जातीचा मासा सापडला असून फिकट पिवळ्या रंगाच्या या माशाच्या शरीरावर खवले नसून काटे आहेत. तसेच काळ्या व सोनेरी रंगाची सुंदर नक्षी व चमकदार डोळे आहेत.

 गणेगाव येथील विलास चलाशा भोसले या मच्छीमाराच्या जाळ्यात सापडलेला हा आगळावेगळा मासा मच्छीमार व नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय बनला आहे. भोसले व त्याचे कुटुंबीय अनेक वर्षापासून वडिलोपार्जित  मासेमारी व्यवसाय करतात. परंतु यापूर्वी कधी अशा प्रकारचा मासा त्यांनी पाहिला नसल्याचे सांगितले.साधारणपणे अडीच किलो पेक्षा जास्त वजन असलेला हा जिवंत मासा त्यांनी आपल्या घरी आणून पाण्याच्या टबमध्ये ठेवला असून त्याचे संगोपन शेततळे किंवा विहिरीत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

 हा मासा सकर फिश असल्याचं येथील मच्छिमार अभ्यासकांच मत आहे. माशाला जबडा नसून वर्तुळाकार तोंड असते त्याद्वारे तो त्याचे अन्न शोषून घेतो. या प्रजातीच्या माशांची पैदास या परिसरात होत नसून तो पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आला असावा असं मच्छिमार अभ्यासकांचं मत आहे.हा मासा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या