गोल्डन सीताफळाला सत्तरचा भाव

डोंगरी कच्चा सीताफळांना मागणी रोजगारही झाला उपलब्ध


शिरूर कासार  : (प्रशांत बाफना)


यांत्रिकी व विज्ञान युगाचे निसर्ग शेतीत देखील अमुलाग्र बदल घडवून आणल्याचे आता दिसत आहे. वेगवेगळ्या मोसमानुसार वेगवेगळी फळे येत असतात. ज्या त्या ऋतुत ते खाणे शरीरासाठी पौष्टीक ठरत असतात. मात्र आता यात देखील क्रांती घडवून जवळपास बाराही महिने फळे बाजारात येत असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने थंडीच्या शरद ऋतूमध्ये दिवाळी दसरा या कालावधीत डोगरदरीत निसर्गाची देत असलेली सीताफळ लागली जातात या डोंगरी सीताफळाची चवही निसर्गनिर्मित असल्याने ती पौष्टीक ठरतात.
 मात्र आता अन्य फळांबरोबर बागायती क्षेत्रात सीताफळाची लागवड करुन मोठमोठी सीताफळ उत्पादित केले जातात. त्यास गोडी असली तरी डोंगरी सीताफळाची सर येतच नाही. तालुक्यातुन ही डोंगरी सीताफळ मोठ्या शहरांकडे ट्रकने जात असतात. त्यातून ग्रामीण भागातील शेतमजूरांना आर्थिक हातभार मिळतो. वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पादन वाढीसाठी आता बागायती शेतीत गोल्डन सीताफळ लागवड केली जात आहे, असे असले तरी डोगंरी सीताफळाकडे ओढा अधिक असतो. पर्याय म्हणुन गोल्डनला देखील अधिक दाम मिळत असल्याने शेतकरी सीताफळ लागवडीकडे झुकला जात असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात डोंगर परिसरात मोठा असून पिपळेवाडी, खोलेवाडी, सव्वासवाडी, सिंदफणा, भडकेल, पिंपळनेर , गोमळवाडा पट्ट्यात गावरान डोंगरी सीताफळ मोठ्या प्रमाणात आहेत. पुर्वी ही सीताफळ जवळच्याच मोठ्या गावात शिरूरच्या पेठेत विक्रीसाठी येत असत नगावर पाच ते दहा रुपयांपर्यंत विक्री होत असे, मोठी कुटुंब अख्खी पाटी गुत्तीच घेऊन सर्वांना सीताफळ खाऊ घालत असायचे , पुढे बाहेरची व्यापारी येऊ लागले आणि कच्ची सीताफळ घेऊन मोठ्या शहरांकडे नेऊन जाऊ लागले. सीताफळातून दोन पैसे मिळू लागले परिणामी हा एक व्यवसायच बनला यावर्षा पाऊस चांगला झाल्याने तीन महिने सीताफळ निघाली एका आठवड्यात किमान दोन ते तीन ट्रक टेम्पो भरली जात होती. डोंगरी सीताफळांनी बीडची सीमा मर्यादा ओलांडत थेट पुणे, मुंबई, नागपूर ओलांडून थेट हैदराबाद, इंदौर  देखील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून गाठले मजूरांना यातून रोजगार मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या