कनसेवाडी परिसरात बिबट्याचा वावर,नागरिकांमध्ये दहशत


श्रीगोंदा प्रतिनिधी 

तालुक्यातील कनसेवाडी परिसरात बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांनी व रहिवाशांनी यांनी तातडीने वन विभागाला आदेश देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

बिबट्याच्या वावराचे अस्तित्व जाणवून देणारे पायाच्या ठशांचे फोटो वनविभागाला स्थानिकांनी दिले आहेत. वनविभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्यासमवेत बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी केली. त्यावेळी या भागातील शेतकऱ्यांनी काही दिवसात या भागातील कुत्री कमी झाल्याचे सांगितले व एका प्रत्यक्षदर्शीने बिबट्या रात्री कुत्र्यांची शिकार करून त्यांना झाडीमध्ये ओढून नेत असल्याचे सांगितले.


नागरिकांनो सतर्क रहा, वनविभागाच्या सूचना

त्याचबरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे. शेतात काम करत असताना शक्यतो खाली बसून काम करू नये व आपल्या जवळील मोबाईल मध्ये मोठ्याने गाणी लावावीत जेणेकरून आवाजामुळे बिबट्या त्या भागात फिरकणार नाही, अशाही सूचना वनविभागाने केलेले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या