'बीएमपी'चे लाईट बिल जलाओ आंदोलन


इंदापूर  प्रतिनिधी

थकित वीज बिलामुळे सुरू असलेली वीज कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवावी. दोनशे युनिट पर्यंत चे वीज बिल माफ करण्यात यावे.मीटर भाडे कपात करण्यात यावे.सक्तीची वीजबिल वसुली तात्काळ थांबवावी अशा विविध मागण्यांसंदर्भात बहुजन मुक्ती पार्टी च्या कार्यकर्त्यांकडून लाईट बिल जलाओ आंदोलन इंदापूर नगरपरिषदेसमोर बुधवारी (दि.१०) करण्यात आले.

महाराष्ट्रामध्ये विविध पक्ष विज बिल माफीचा तसेच मोफत वीज देण्याचा नारा देऊन सत्तेवर येत असतात.परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर वीज बिलाच्या संदर्भामध्ये सरकार बोलताना दिसत नाही.या उलट महाराष्ट्र मध्ये जी सरकारे बनली आहेत,त्या सरकारने सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये वीज शुल्क आकारून लूट केली आहे. त्याच्यामध्ये शेतकरी असतील, घरगुती वीज कनेक्शन असेल किंवा व्यापारी असतील या सर्वांची लूट सरकार करत आहे. त्यामुळे वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भारत मुक्ती मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे यांनी दिला.प्रसंगी बलभीम राऊत व वसीम शेख यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बीएमपीचे शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर, विद्यार्थी मोर्चा जिल्हा प्रभारी सुरज धाईंजे,इम्रान बागवान,रोहित ढावरे,नागेश भोसले,राहुल शिंगाडे,नागेश भोसले,प्रकाश पवार,तौसिफ बागवान आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या