शिरूर पोलीस इलेव्हन ठरले पैलवान चषकाचे मानकरी


कर्जत प्रतिनिधी | राष्ट्रसह्याद्री 

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांच्या वाढदिवसानिम्मित आयोजित "पैलवान चषकाचे" मानकरी शिरूर पोलीस इलेव्हन ठरले असून त्यांनी अंतिम सामन्यात एसआरपीएफ दौंड संघावर मात करीत आपले नाव कोरले. यावेळी विजेत्या संघास पैलवान चषक आणि रोख ७७ हजार ७७७ रुपयांचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

कर्जत शहरात मागील पाच दिवसापासून काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांच्या वाढदिवसानिम्मित नगरसेवक सचिन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण घुले मित्रमंडळाच्यावतीने "पैलवान चषक" क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी शिरूर पोलीस इलेव्हन आणि एसआरपीएफ दौंड यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना शिरूर पोलीस इलेव्हन संघाने सहा षटकांत ९६ धावा केल्या. यात कुणाल खोंड याने प्रेक्षणीय फटके मारीत आपले अर्धशतक पार पाडले. ९६ धावाचे लक्ष्य पार करीत असताना एसआरपीएफ दौंड संघाचे फलंदाज बाद होत गेल्याने त्यांना आपला पराभव स्वीकारावा लागला. अखेर पैलवान चषकावर शिरूर पोलीस इलेव्हनने आपले नाव कोरले. आणि एसआरपीएफ दौंड संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्याचा मानकरी यासह मॅन ऑफ द सिरीज कुणाल खोंडे ठरला. तर उत्कृष्ट गोलंदाजाचा मान संतोष कुदळे याला मिळाला. सदर सामन्यासाठी पंच म्हणून दीपक पिळगावकर, अक्षय चांदगुडे आणि राणे यांनी काम पाहिले. 

अंतिम सामना संपल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले,  तालुकाध्यक्ष किरण पाटील, नगरसेवक सचिन घुले, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, जेष्ठ नेते तात्यासाहेब ढेरे, राष्ट्रवादीचे प्रसाद ढोकरीकर, सचिन कुलथे, माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, सामाजिक कार्यकर्ते भास्कर भैलूमे, काकासाहेब शेळके आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विजेता, उपविजेता यासह तृतीय आणि चतुर्थ संघास पैलवान चषक आणि रोख रकमेचे बक्षीस प्रदान करण्यात आले. यासह कर्जत तालुक्यातील अनेक नामवंत खेळाडूचा सन्मान संयोजक प्रवीण दादा घुले मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी अमोल भगत, अमित तोरडमल, नितीन गदादे, अतुल धांडे, विशाल तोरडमल, शेरखान पठाण, विजय मोरे, पिंटू शेलार यांनी उत्तम संयोजन केले. तर प्रीयेश सरोदे, शिवम कांबळे, राम जहागीरदार, रवी सुपेकर, राजू बागवान, अमोल तोरडमल, दीपक बोराटे, सुजित घोरपडे, विजय तोरडमल, उमेश गलांडे, गणेश लोखंडे, कार्तिक तोरडमल, कार्तिक शिंदे, आदित्य घुले, रिकी पाटील, प्रणित पाटील, अक्षय तोरडमल, माजीद पठाण, इम्रान पठाण, युनूस पठाण, हर्षदीप सोनवणे, स्वप्नील बोरकर, निखिल कोठारी, विकास पवार, भीमा थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. 


 १) प्रथम बक्षीस : महेश तनपुरे ७७ हजार ७७७ रुपये - शिरूर पोलीस इलेव्हन ( विजेता संघ)

२) द्वितीय बक्षीस : विलास निकत ५५ हजार ५५५ रुपये - एसआरपीएफ दौंड (उपविजेता संघ) 

३) तृतीय बक्षीस - रणजित नलवडे ४४ हजार ४४४ रुपये - देसाई इलाई टेड पीसीएमसी पुणे. आणि

४) चतुर्थ बक्षीस : ओंकार तोटे ३३ हजार ३३३ - वाजीद इलेव्हन दौंड. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या