नवी दिल्ली: मला सत्तेत नाही तर सेवेत राहायचं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मनातील भावना देशावासियांशी बोलून दाखवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून देशावासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बातमधून विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, वृदांवन धामची भव्यता, पर्यावरण आदी मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळालेल्या राजेश कुमार प्रजापती नावाच्या व्यक्तीशी मोदींनी संवाद साधला. त्याचं आजारपण, त्याला मिळालेली मदत आदी मुद्द्यांवर मोदींनी प्रजापतीशी संवाद साधला. तसेच इतरांनाही या योजनेची माहिती देण्याचे आवाहन मोदींनी त्याला केलं. त्यावेळी प्रजापती यांनी मोदींच्या दीर्घायुष्याची कामना केली. तुम्ही सत्तेत रहोत अशी भावनाही त्याने व्यक्त केली. त्यावेळी मी आता सत्तेत असल्याचं मानत नाही. सत्ता ही सेवेसाठी असते. मी आज पण सत्तेत नाही, भविष्यातही सत्तेत जाऊ नये, अशी माझी भावना आहे. मी सत्तेऐवजी सेवेला महत्त्व देतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
0 टिप्पण्या