पुण्यात सीएनजी चे दर वाढले


पुणे

काही दिवसापासून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सामना केल्यानंतर आता पुणेकरांना आता 'सीएनजी'च्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरवाढीचाही दणका बसला आहे. सीएनजीचा वापर करीत असलेल्या अनेक वाहनधारकांना यामुळे आर्थिक झटका बसला आहे. गुरुपासून सीएनजी एक रुपये 80 पैशांनी महागले आहे. त्यामुळे आता शहरात एक किलो सीएनजीसाठी ६३. ९० रुपये मोजावे लागणार आहे.

दिवाळीत पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. हा दिलास अद्याप कायम असून त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत.मात्र आता सीएनजीचा भडका होत असल्याचे दिसते.

गुरुवारी सीएनजी 1.80 रुपयांनी महागले. मार्च 2020 पूर्वी तीन ते चार महिन्यांतून एकदा सीएनजीच्या दरात वाढ होत. ही वाढ जास्तीत जास्त एक रुपयांपर्यंत असायची. मात्र आता दर महिन्याला दरवाढ होत असून ती दोन रुपयांच्या पुढे देखील जात असल्याचे यातून स्पष्ट होते.

गेल्या महिन्यात दोनदा दरवाढ होऊन सीएनजी प्रतिकिलो ४.०६ रुपयांनी महागले होते. चार आणि १४ आॅक्टोंबर रोजी अनुक्रमे दोन आणि २.६ रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. एका महिन्यात दोन वेळा चार रुपयांनी दरवाढ झाल्याची ही पहिलीच घटना आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या