थ्रीडी व पोस्टर रांगोळीतून सजतेय अंगण


जामखेड तालुका प्रतिनिधी 

दिवाळीसाठी अंगणातील रांगोळी कशी वेगळी दिसले याबाबत महिला जागरूक असतात. घरोघरी किशोरी , युवतींसह महिला एकेक ठिपके जोडून , रंगीबेरंगी नक्षीतून रांगोळीच्या कल्पना इतक्या झेपावल्या आहेत की यंदा थ्रीडी व पोस्टर प्रकारच्या रांगोळीतून यंदाच्या दिवाळीत घरोघरीचे अंगण सजू लागले आहेत. या दोन्ही पध्दती ऐकलयला ' मॉडर्न असल्या तरी त्याची परिणामरकारकता मोहनी घालणारी आहे.

दिवाळीचा फिल देणाऱ्या पणत्या , आकाशकंदिल , दिवा , लक्ष्मीपूजनातील कलश , नाणी , पाडव्याला पूजली जाणारी वही , तुळशी वृंदावनाचा हुबेहूब भास या रांगोळीतून मिळतो. यासाठी दिवाळीच्या विविध दिवसांसाठी खास थ्रीडी व पोस्टर रांगोळी रेखाटण्याकडे अनेकजणी पसंती देताना दिसत आहेत.

रांगोळी ही परंपरेचे प्रतीक रांगोळीला कल्पकतेची जोड देत कलाकार , युवतींनी प्रयोगशील बनवले. त्याचाच नवा पैलू म्हणजे थ्रीडी व पोस्टर रांगोळी. वसुबारस , धनत्रयोदशी , लक्ष्मीपूजन , पाडवा , भाऊबीज 

तुळशी विवाह अशा दिवाळीच्या विविध दिवशी थ्रीडी रांगोळीतील विविध प्रकार कलाकारांकडून साकारले जात आहेत. एखादे सुबक दृश्य परिणामकारक रंगसंगतीसह पृष्ठभागावर उमटवून यंदाची दिवाळी अधिक चैतन्यदायी करणार आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या