नगर
नगर जिल्ह्यामध्ये दरोडा व घरफोडी सारखे गुन्हे करणारा सराईत फरार आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखाला यध मिळाले आहे.
अहमदनगर येथील ज्ञानेश्वर गोवर्धन लोंढे राहणार शेवगाव यांच्या घरी 1,59000 रुपयांचा दरोडा पडला त्यानुसार 17 जून 2021 रोजी शेवगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारे शेवगाव भागातील वेगवेगळ्या ठिकाणी आणखी घरफोडी व दरोड्याचे आठ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात फिर्यादीच्या घरातला लाखो रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी आपल्या घशात घातला.
अशा प्रकारे शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाल्यानंतर सदर गुन्हयांच्या तपासामध्ये निष्पन्न आरोपी, सचिन विजय काळे रा.शेवगाव पाथर्डी रोड , ता . शेवगाव हा दरोड्यातील हे गुन्हे दाखल झाल्यानंतर फरार झाला होता.
उपमहानिरीक्षक , नाशिक परीक्षेत्र , बी.जी.शेखर अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे या फरार आरोपींचा शोध घेत असताना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, गुन्हयांतील फरार आरोपी सचिन काळे हा अहमदनगर येथे येणार आहे . त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , पोलीस हेड कॉन्स्टेबल मन्सुर सय्यद , पोलीस नाईक शंकर चौधरी , पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे , पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरुट , पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे यांनी सदर गुन्हयातील फरार आरोपी सचिन काळे (वय २५) यांस अहमदनगर शहरातुन अतिशय शिताफीने ताब्यात घेवुन पुढील कारवाईसाठी शेवगाव पोलीस स्टेशनला हजर केले आहे . पुढील कार्यवाही शेवगाव पो.स्टे . करीत आहेत.
0 Comments